जिल्ह्यात तेरा दिवसांत ३४०८ कोरोनाबाधितांची पडली भर जिल्ह्यात आज २१४ रुग्ण वाढले

Foto
जिल्ह्यातील १५ ऑगस्ट पासून आजपर्यंतचा कोरोनाचा अहवाल पाहिला तर या तेरा दिवसांपूर्वी एकूण रुग्णसंख्या १८५६५ होती तर या दिवसांत तब्बल ३४०८ रुग्णांची भर पडली आहे. त्यातील आज सकाळी पहिल्या टप्प्यात २१४ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही आज २१९७३ वर जाऊन पोहचली आहे. तर या तेरा दिवसापूर्वी कोरोनाबाधीत मृत्यूची संख्या ही ५८१ होती. त्यात तेरा दिवसांत ७८ रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील एकूण मृत्यू होण्याची संख्या ही ६५९ वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. 

जिल्ह्यात तेरा दिवसात ३०७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर जिल्ह्यातील आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण २१९७३ कोरोनाबाधितांपैकी आजपर्यंत १६७१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आजपर्यंत ६५९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ४६०१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. 
शहरात १४४ रुग्ण वाढले
शहरात १४४ रुग्ण वाढले आहेत. त्यात एन तीन सिडको-५, मिल कॉर्नर -७, गांधीनगर -१, रेल्वे स्टेशन परिसर-३, एन दोन सिडको -१, ठाकरेनगर, सिडको-१, छत्रपतीनगर, हर्सुल-१, उल्कानगरी-१, राजधानीनगर, पडेगाव-१, अहिंसानगर, आकाशवाणी परिसर-२, आदिनाथनगर, गारखेडा-१, यशवंतनगर, बीड बायपास-१, शहानूरवाडी-१, एन सात सिडको-१, एन नऊ सिडको-१, पदमपुरा-३, मार्ड हॉस्टेल परिसर-२, प्रकाशनगर-३, व्यंकटेशनगर-१, जीडीसी हॉस्टेल परिसर-१, न्यायनगर-१, भावसिंगपुरा -१, म्हाडा कॉलनी, चिकलठाणा-१, एनआरएच हॉस्टेल परिसर-१, जैन मंदिराजवळ, जटवाडा-१, शिवनेरी कॉलनी, गारखेडा-१, एन नऊ, पवननगर-४, स्वप्ननगरी, गारखेडा-१, जैननगर,उस्मानपुरा -१, रमाईनगर, हर्सुल-६, एन पाच सिडको -१, अबरार कॉलनी-२, सिल्क मिल कॉलनी-२, साईशक्ती अपार्टमेंट, कांचनवाडी-१, व्हिजन सिटी गेस्ट हाऊस, वाल्मी-५, सैनिक विहार, कांचनवाडी -१, हरिसिद्धीनगर, हर्सुल-४, मलिक अंबर कॉलनी -१, एमजीएम हॉस्पीटल परिसर-२, नूतन कॉलनी-१, शहानूरवाडी-६, पारिजातनगर-३, बेगमपुरा -२, सुराणानगर -१, जय हिंदनगर, नवीन म्हाडा कॉलनी-१, पगारिया ऑटो-१, देवगिरी कॉलनी-१, नारळीबाग-५, व्यंकटेशनगर-१, आरतीनगर, पिसादेवी रोड-८, टीव्ही सेंटर -२, नूतन कॉलनी-१, कपिला सोसायटी एन सात सिडको -१, मनजितनगर-४, श्रेयनगर-२, गुलमोहर कॉलनी, सिडको-१, भाग्यनगर -१, एसबीएच कॉलनी, पीर बाजार, उस्मानपुरा -२, मयूर पार्क -१, मिलिट्री हॉस्पीटल परिसर -२, पिसादेवी-१, स्मार्ट सिटी कार्यालय परिसर-२, एन अकरा, सिडको-१, फुले कॉलनी, खोकडपुरा-१, छत्रपतीनगर-१, सम्राटनगर-१, एन एक सिडको-१, एन तीन सिडको-१, खिवंसरा फोर्ट -१, कांचनवाडी-१, निरालाबाजार-१, पोलिस कॉलनी, पडेगाव -१, खडकेश्वर-१, कोमलनगर, पडेगाव-१, नाईकनगर-१, सातारा परिसर-२, मिटमिटा-१, एन सहा सिडको-१, इतर-२ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. 
ग्रामीण भागात ७० रुग्ण 
ग्रामीण भागात ७० रुग्ण आढळून आले आहेत. त्यात 
वानेगाव, फुलंब्री -१, करमाड रेल्वे स्टेशन परिसर-१, गंगापूर जहांगीर-१, ग्रोथ सेंटर, साऊथ सिटी-१, वाळूज महानगर दोन-३, वाघेरा मदनी, सिल्लोड-१, मोरे चौक, वाळूज -१, वाळूज महानगर एक-१, माळीवाडा, कन्नड-१, वाळूज-१, जामगाव, गंगापूर-१, हडज पिंपळगाव, वैजापूर -१, गणेशनगर, वाळूज-१, गणेश मंदिराजवळ, बजाजनगर-२, ओमसाईनगर, रांजणगाव-१, विठ्ठल मंदिराजवळ, कमलापूर -३, अविनाश कॉलनी, वाळूज-१, मनूर,भटाना-४, शिक्षक कॉलनी, शिऊर -१, मधला पाडा, शिऊर-१, भालगाव, करमाड -१, गुंटेगाव, पैठण-१, न्यू नराळा, पैठण-१, भवानीनगर, पैठण-४, नराळा, पैठण -१, इतर-१, दत्त मंदिराजवळ, पैठण-१, आपेगाव, पैठण -१, परदेशीपुरा, पैठण -१, ज्ञानेश्वरवाडी, पैठण -१, पाटील गल्ली, गंगापूर-१, नूतन कॉलनी, गंगापूर -४, देवळी गल्ली, गंगापूर -१, गोदावरी कॉलनी, गंगापूर-१, नरवाडी, गंगापूर-१, प्रगती कॉलनी, गंगापूर-२, शिवाजी चौक, गंगापूर-१, माळुंजा, गंगापूर-१, रांजणगाव, गंगापूर -१, टिळकनगर, सिल्लोड -२, गेवराई, सिल्लोड-१, शिवाजीनगर, सिल्लोड -३, हनुमाननगर, सिल्लोड-१, वडोद, सिल्लोड-१, बालाजीनगर, सिल्लोड-१, गंगापूर रोड, वैजापूर-२, सावखेडा, वैजापूर-१, श्रीरामनगर, वैजापूर-१, मारवाडी गल्ली, वैजापूर-१ , मुळे गल्ली, वैजापूर-१, जीवनगंगा परिसर, वैजापूर -१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.